हजल - रिक्षा

सुन्न मी रस्त्यात, माझ्या भोवती रिक्षा
पाहतो जेथे कुठे मी धावती रिक्षा


डास का फैलावती मी ऐकले होते
गाव हे कैसे इथे फैलावती रिक्षा


पादचार्‍यांनो अता जीवास सांभाळा
चालणार्‍या माणसांना चावती रिक्षा!


ना जरी जागा इथे मुंगीस चालाया
थोडक्या जागेतही या मावती रिक्षा


यां सवे तू बोलताना बोल प्रेमाने
बोलले उलटे जरा की कावती रिक्षा


निर्मिती यांची कशाने वाढते आहे
ईश्वराला का कळेना भावती रिक्षा!


रिक्षात्रस्त पुणेरी नागरिकांना व रिक्षाग्रस्त पुण्याला समर्पित...