तोल

उर्दूचे सुप्रसिद्ध शायर फैझ अहमद 'फैझ' यांच्या 'रक़ीबसे' या कवितेच्या शेवटच्या काही ओळींचा हा अनुवाद...

जेव्हा भर बाजारी विकते मजुराचे मांस

रस्त्यावर दरवळतो त्याच्या रक्ताचा वास

किंवा कोणी अपुली ढेरी सावरीत येतो

कंगालांना साऱ्या बुडवून टाकावे म्हणतो

तेव्हा माझ्या ह्रदयी एकच वडवानल उठतो

सांगू कसा गड्या रे माझा तोलच ढासळतो!