प्रेमपत्र पहिले लिहिताना... (भावानुवाद)

प्रेमपत्र पहिले लिहिताना वेळ लागतो
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...

'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...

धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...

उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...

गजल-रसिकहो,

१. हा भावानुवाद कोणत्या गजलेचा आहे ते ओळखा.
२. नुसते ओळखू नका, प्रतिसादही द्या.
३. मूळ शायराचे नाव आणि गजलेचा 'दुवा'ही कोणी दिल्यास उत्तम.
४. प्रशासकांना विनंती की प्रतिसाद काही काळ छत्रात ठेवावेत.
५. कृपया प्रतिसाद व्य. नि. तून पाठवू नयेत.