वर्णद्वेष?

मनोगतींनो,

आजच्या इ-सकाळमध्ये "बिपाशा बसू, अर्शद वारसीला लंडनमध्ये वर्णद्वेषातून त्रास" ही बातमी वाचली. मागे एकदा अमेरिकेतही असंच काहीसं घडल्याची बातमी वाचल्याचं आठवतंय! बरं, हे भारतीयांच्या (गहुवर्णीय) बाबतीतच घडतंय की बाकीच्या (चायनीज, मेक्सिकन इ.) लोकांनाही ते अनुभवास येत असावं? इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेसारख्या गौरवर्णीयांचे प्रमाण जास्त असलेल्या देशांत असं होतंय की साधारणपणे सगळीकडेच? म्हणजे, चायनीज/जापनीज लोकांनी वर्णद्वेषातून गौरवर्णीय, कृष्णवर्णीय वा गहुवर्णीयांना त्रास दिल्याचं ऐकलं नाही कधी. का तिथेही असंच होतं? अमेरिकेत बऱ्याचवेळा कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय गळ्यांत गळे घालून फिरताना दिसतात. की ते नुसतेच दाखवायचे दात असावेत?

युरोप, अमेरिका, एशिया-पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, अफ्रिका इ. खंडांतील विविध देशांत राहणाऱ्या मनोगतींनी त्यांच्या कायम/तात्पुरत्या वास्तव्यात कधी स्वतःबाबत/इतरांबाबत अनुभवलंय का असं काही जवळून/दुरून? सांगाल का तुमचे अनुभव? हे खरंच वर्णद्वेषाच्या भावनेतून होत असावं की इतरही काही कारणं असू शकतात? असे प्रकार टाळता येऊ शकतील का? किंवा असे काही घडल्यास काही उपाय योजना करता येते का? का त्यासाठी तुम्ही 'शिल्पा शेट्टी' असणेच गरजेचे आहे? असे प्रकार भविष्यात कमी होतील की वाढतील? काय वाटतं तुम्हाला?

विषयाचा बाऊ न करता खरंच काही अनुभव, निरीक्षणं यांची निखळ चर्चा करुया का?