"नकार" किती नकारात्मक शब्द आहे आणि तेवढाच भयानक एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करून सोडतो तर एखाद्याला आयुष्य जगायचे कसे ते दाखवून देतो. साहजिक चं आहे माझ्या ही बाबतीत असेच काही तरी घडले म्हणूनच तर लिहितो आहे.
प्रेमाच्या सुंदर स्वप्नांतून जागा होतो नाही तोच आयुष्याने त्याचे रंग दाखवायला सुरवात केली. ज्या स्वप्नावर आता पर्यंत जगत होतो ते डोळ्या समोरून धूसर होत चालले होते, मनात नुसती चिडचिड होत होती. काही करून पण ती थांबायला तयार होईल असे वाटत नव्हते. उलट काही केले तर अजून बिघडून परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकत होती. कारण माजे सगळे बोलणे हे तिला माजे स्पष्टीकरण चं वाटत होते, आणि माला नेमके याच वेळी काही शब्द फुटत नव्हते. माझ्या डोळ्या समोर मात्र तोच दिवस दिसत होता...
मी नवीन कॉलेज मध्ये नुकताच रुळू लागलो होतो, तोच एके सकाळी कूलर जवळ पाणी पीत असताना बाजूला काही तरी हालचाल जाणवली म्हणून बघितले, सडपातळ, मध्यम उंची सावळसर पण उजळ रंगाची एक मुलगी भरभर चालत वर्गात चाललेली, माझ्या कडे बघून जरा तिला धीर आलेला पण तरी न थांबता सरळ वर्गात घुसली, माला ही त्याच वर्गात जायचे होते पण मी उगाच टगळ मंगळ करत राहिलो आणि तिचे वर्गात गेल्या नंतर थोड्याच वेळात मी: "मे आई कम इन" करत वर्गात एंट्री मारली, तर पहिली नजर त्याच मुलीवर थांबली आणि ती ही मलाच पाहत होती एका आश्चर्यचकित नजरेने ! मी मनातल्या मनात इतका सुखा ऊन गेलो होतो की पूर्ण लेक्चर काय होत हे तर माला आजही आठवत नव्हते. आठवत होते ते फक्त तिचे ते निरागस रूप, तिने मला पाहणे आणि मी तिला, क्षण भर मी कुठल्या दुनियेत हरवलो कुणास ठाऊक. लेक्चर संपले आणि मी भानावर आलो, आणि नजर वळली ती थेट तिच्या कडेच. आणि मला प्रत्यय आला की ती ही त्याच नजरेने माझ्या कडे बघत आहे एका परिचित नजरेने. सगळे हळू हळू वर्गांतून निघायला लागले आणि मी एका वेगळ्याच आंतरिक ओढी ने तिच्या कडे चलला गेलो. तिला याची जाणीव होताच थोडे सांभाळून ती तिच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधून मागेच राहिली. आणि मी तिच्या जवळ पोहोचलो. तोंडातून शब्द निघाले "हाऽऽऽय" ते ही दोघांच्या ही एकावेळीच. मी आजही अजून पण इतका हळहळ तो की, त्या एका शब्दावर माझ्या मनामध्ये खोलवर कुठे तरी असे काही तरी हळू लगते आणि वाटते जणू समुद्रा च्या त्या खळखळत्या लाटा माझ्या मनाच्या किनाऱ्यावर येऊन विरून जात आहेत.
तो दोन लेक्चर मधला वेळ, वर्गाबाहेर खूप वर्दळ, कोणी तरी ओरडले "नेक्स्ट लेक्चर ऑऽफ" आता वर्ग पूर्ण खाली पण मनात मात्र खूप प्रश्न तेच बाहेर पडत होते, नाव, गाव, कुठे राहते इत्यादी इत्यादी, मग त्या वर प्रतिक्रिया आणि त्यावर पुन्हा प्रतिक्रिया अश्या गप्पा चालूच एक-मेकां न बद्दल जाणून घ्यायला दोघे ही उत्सुक, पुन्हा कोणी तरी ओरडले प्लीज कीप रूम व्हेकंट. देअर इज अनदर लेक्चर इन धिस रूम. मग आमची स्वारी बाहेर निघाली कुणी इकडे कुणी तिकडे सगळे विखुरले गेले, नवीनं ओळख झालेले माझ्या कडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले, आणि मला थोडे ओशाळल्या सारखे वाटू लागले पण आम्हाला मात्र किती बोलू आणि किती नको असे जाले होते. नकळतच आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो आणि कट्ट्यावर बसून उरलेल्या गप्पा पूर्ण करू लागलो. गप्पा संपताच नव्हत्या आणि माजे तिला आणि तिने मला न्याहाळणे देखील का कुणास ठाऊक अनोळख्या जागी कोणी तरी ओळखीचे भेटले याचा आनंद होत होता की जणू ही ओळख खूप दिवसां पासून ची असल्याची जाणीव होत होती. त्या नंतर मला असे सुखद धक्के मिळतच गेले आणि मी आणि ती जेवढे सुखावत गेलो तेवढेच जवळ ही येत गेलो. या नंतरचे सर्व काही एका स्वप्ना प्रमाणे घडत गेले आणि त्या सुंदर क्षणां मध्ये मी इतका हरवून गेलो की मी माझाच न राहिलो अन मैत्रीच्या त्या नात्यामध्ये विरून गेलो. दोघांनी मिळून कुठली गोष्ट सोडली नव्हती की जी वाटून घेतली नसेल. लेक्चर नोट्स, पासून ते घरून आलेल्या खाऊच्या डब्या पर्यंत, लहानपणा पासून ते अगदी आतापर्यंत सर्व घटना आणि सर्व गोष्टी दोघांच्या एकमेकांना इतक्या पाठ झाल्या होत्या की विषय निघायची सुरवात पुढील सर्व संवाद आपोआप पूर्ण होत असे. माझ्या मना सारखी मैत्रीण मिळाल्यामुळे मी इतका आनंदी होतो की या हून ही जास्त आनंद जर कुठे असतो असे मला जर कोणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. त्या मुले या पुढे जायचा मी कधी विचारच केला नाही. कारण... अगदी गौरव जोशींच्या कविते सारखे मला ही वाटू लागले होते "मला वाटायचे तिचे माझ्यावर जिवापाड प्रेम आहे, फक्त विचारायची देरी आहे..."
बेस्ट फ्रेंड बाय गौरव जोशी
मला वाटायचे तीच माझ्यावर जिवापाड प्रेम आहे फक्त विचारायची देरी आहे.
मालाही ही टी खूप आवडायची जेव्हा मला ती आपला बेस्ट फ्रेंड मानायाची.
मनातलं गुपित फोडायची,
लाडात येऊन बोलायची,
लटकत रागावायची,
माझ्याशी भांडायची,
गप्पा मारायची,
माझ्या कविता ऐकायची,
त्यांना उत्स्फूर्त दाद द्यायची,
माझ्यावर प्रेम करायची...
पण मला माहीत नव्हत ती मला फक्त आपला बेस्ट फ्रेंड मानायाची.
आजही त्या ओळी वाचून मन अगदी भरून येत होते !
परंतु आज मला बेस्ट फ्रेंड या शब्दावर चीड येत होती...का कुणास ठाऊक पण माझ्या मस्तकी प्रचंड आग होत होती, टेकडी वरच्या त्या गार वाऱ्यात पण नुसती आग आग होत होती. मी जळत होतो, पूर्ण पेटून गेलो होतो. माझ्या स्वप्नांची होळी मीच पाहत होतो. निमित्त होते ते फक्त एवढेच माजीच मैत्रीण आज माला सोडून चालली होती. आणि मी फक्त पश्चात्तापा शिवाय काहीच करू शकत नव्हतो.
मध्यंतरी पुला खालून खूप पाणी गेले होते, कॉलेज संपून खूप दिवस जाले होते तरी आमच्या भेटी चालू होत्या
नोकरी शोधताना नाकी नऊ येत होता तो काळ असा होता की साधी दोन तीन हजराची नोकरी पण सहजा मिलत नसे. मला माजेच वाईट वाटू लागले, आणि त्या मुले मी तिला काहीच सांगूच शकलो नाही, पण ती माझ्या मागे सदैव उभी राहिली. पण शेवटी माझ्या हातातून वेळ निसटून चालली होती. मी वेड्या सारखा नोकरीच्या शोधत वन वन भटकत होतो एक्स्पिरिअन्स नसल्या मुले कोणीच उभे करत नव्हते. शेवटी मला ते शहर सोडून जाणे भाग पडले आणि एका नवीन शहरात मी माझे जीवन सुरू केले. मना मध्ये एकच स्वप्न , एकच आस्था, एकच निराशा पण त्या बरोबर एक ध्येय. काही करून स्वतःला सिद्ध करून आपली स्वप्ने परत मिळवायची, दिवसाची रात्र करून नवीनं नवीनं टेक्नॉलॉजी शिकू लागलो आणि मिळालेल्या एका संधीचे सोने करायचे ठरवले. छोट्याश्या एका कंपनीतून सुरवात करून एक एक करत पायऱ्या चढू लागलो. जेव्हा एक चांगली नोकरी मिळाली तेव्हा पाहिले काम केले ते माझ्या सखेला ही बातमी दिली तशी ती तेव्हा माझ्या बरोबरच होती त्या इंटरव्ह्यूला. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मी पाहून खूप सुखावलो होतो! आता मला कोणीच थांबवू शकत नव्हते. माझ्या स्वप्नां पासून ...आटा फक्त मी विचारायची देरी आहे ...
आजचा दिवस खासच होता! मला एका बऱ्यापैकी चांगल्या कंपनीतून इंटरव्ह्यू कॉल आलेला, मी टेलिफोन बूथ वर जाऊन फोन फिरवला आणि पहिली बातमी सांगितली ती तिला, तिला ही खूप आनंद जाला आणि सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा की मी पुन्हा त्याच शहरात जात होतो. त्या निमित्ताने आमची खूप दिवसांनी भेट होणार होती. हे नशीब पण कधी कधी इतके चांगले वागू लगते की आपलाच त्याच्या वर विश्वास बसत नाही. जसे विचार केले तेच घडत होते अगदी तसेच मला माजी संधी मिलत होती आणि ती पण त्याच शहरात! किती अद्भुत होते ते सगळे. काही तरी कारण काढून ती पण माझ्या बरोबरच येणार होती तेव्हढाच जास्त वेळ सहवास!
शेवटी तो क्षण आला होता तिच्या हातात माझे अपॉइंटमेंट लेटर आणि मी तिच्या समोर उभा! काय बोलावे कुणालाच काही सुचत नव्हते. खूप वेळ असाच गेला आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर परतलो आणि त्या नेहमीच्याच पायऱ्यां वर बसलो. ती मला सांगत होती जा घरी फोन कर पण मी मात्र तसाच तिच्या बाजूला बसलो होतो. मला काही तरी सांगायचे होते आणि तिला पण काही तरी ऐकायचे होते, दोघेही स्तब्ध. इथले तिथले विषय निघत होते पण मूळ मुद्दा मात्र बाजूलाच राहत होता. आणि मग तिने सांगायला सुरवात केली. तिच्या घरी तिच्या साठी स्थळ बघत होते. पण काही अजून जुळत नव्हते. तिला हे दुःख खूप दिवसां पासून सांगायचे होते आणि ती बोलतच राहिली. एका क्षणी मी तिला अडवून तिचे डोळे पुसू लागलो, तिचा हात हातात घेऊन तिला सांगू लागलो. ते सर्व जे इतके दिवस मनात होते, ते सर्व जे नेहमी अगदी ओठावर येऊन हवेत विरून जात होते. ते सर्व काही जे मी तिच्या साठी फक्त तिच्या साठी करायचे ठरवले होते. ते माझे स्वप्न मी तिला शब्द नि शब्द सांगत होतो. पण ... पण ती मात्र एका वेगळ्याच विचारत मग्न होती. जशी ती माझ्या पासून खूप दूर गेली होती. क्षणात भानावर येऊन तिने तिचा हात माझ्या हातातून दूर केला. [float=font:mohini;place:top;]आणि मनावर दगड ठेवल्याप्रमाणे तिने सांगायला सुरुवात केली मला काहीच कळत नव्हते तिचे वाक्य आणि वाक्य मला टोचत होते.[/float] म्हणे तिला माझ्याशी लग्न करणे कधी जमलेच नसते हे तिने फार पूर्वी जाणले होते पण एका मैत्री ने तिला आता पर्यंत रोखले होते. ती ही आजच्या च दिवसाची वाट पाहत होती. ती मला समजवत होती पण मी मात्र काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मला फक्त एवढेच कळत होते माझ्या रंगवलेल्या स्वप्नावर लाल रंगांनी ओढलेला हा एक नकार होता!
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचा फोन आला "हेलो त्रिश" अगदी सहजते ने विचारपूस करून तिने मला धक्काच दिला होता जणू काही घडले नाहीच अश्या थाटात बाईसाहेब माझ्याशी बोलत होत्या. मी नुकताच उठलो होतो पण सवरलो मात्र नव्हतो. काय बोलावे काहीच कळत नव्हते! संध्याकाळी यायला सांगून तिने फोन ठेवून दिला.
जाग येऊन खूप वेळ झालेला, का झोपलोच नव्हतो! आदल्या रात्री कधी झोप लागली होती माहीत नव्हते आणि आज कधी उठलो तेही माहीत नव्हते. काहीच कळत नव्हते...कळत होते ते इतकेच की काही तरी तुटले होते का माझ्या हृदयाचा एक मोठा तुकडाच पडला होता. प्रेमाच्या सुंदर स्वप्नातून जागा होतो नाही तोच आयुष्याने त्याचे रंग दाखवायला सुरवात केली होती. ज्या स्वप्नावर आता पर्यंत जगत होतो ते डोळ्या समोरून धूसर होत चालले होते. मी सगळा दिवस तसाच अंथरुणात घालवला दुपारचा डब्बा पण तसाच पडून होता. कशाचीच इच्छा होत नव्हती. डोळ्यां समोर पुन्हा पुन्हा तोच क्षण! काय चुकले ? काय कमी राहिले ? का एवढा उशीर झाला मला ? का मी तिला समजायला चुकलो ? का तिने मला समजून नही घेतले ? असे असंख्य प्रश्न, आणि त्या मध्ये गुरफटलेला मी रूम वर तसाच पडून होतो. वेळ तर खूप निघून गेलेला पण माझा मलाच वैताग आलेला. थोडा फ्रेश होऊ आरश्या समोर तोंड पुसत असताना स्वतःचीच नजर चुकवत होतो. आणि जेवा ती भिडली तेव्हा फक्त वाहिली पाणी होऊन...
पुन्हा फोन वाजला तू येतो आहेस ना ? बापरे सात वाजले होते मला काही समजलेच नव्हते! मी: हो येतोय. मग ये लवकर का मी येऊ?, नको मी येतो थोडा वेळ लागेल बस मिळे पर्यंत पण येतोच. सांगून मी फोन ठेवला. आणि पटापट कसे तरी आवरून निघालो. आता मात्र मन शांत होते. कसलाच विचार नव्हता. ती बस स्टॉप वरच वाट पाहत होती. पुन्हा थोडे मागे चालून आम्ही तिथेच पोहोचलो. ती म्हणे आज इथे नको टेकडीवर जाऊ छान थंड वारा असतो. थंड वारा म्हणे, मी एवढा तापलोय आणि ही एवढी थंड! काय झाले आहे हिला हा हिचा कुठला अवतार आहे? आतापर्यंत मी हिला समजावायचो, हिची समजूत मीच काढायचो, हिचे कोणाशी बिनसले की मीच हिचा आधार अगदी घरच्यांचा पण राग मला भेटल्यावर शांत! आणि आज ही एवढी थंड जसे काही हिला हे सगळे अपेक्षितच!
ह्ह्ह्म्म्म्म्म तिला हवे तसे सगळे घडत होते, मला मात्र हे सर्व अनपेक्षितच होते तिने माझ्या बद्दल एवढा विचार आधीच करून ठेवलेला होता तर! हा विचार माला खूप नंतर पटला. तो पर्यंत खूप दिवस निघून गेले होते. आमचे तसे अधून मधून भेटणे होत होते, काहीच नाही तरी फोन वर बोलणे तर नक्कीच. आणि माझी ही अधून मधून चिड चिड चालूच होती. तिने माला अगदी पूर्ण वेळ दिला होता जेवढा ते देऊ शकत होती.
त्या दिवशी चे ते बोलणे माझा अगदी कानात अजून वाजत होते! "म्हणजे माझे प्रेम व्यर्थ ? मी जिच्या वर जिवापाड प्रेम केले तिला माझ्या बद्दल काहीच वाटत नाही." "वाटत नसते तर आज मी तुझ्या बरोबर इथे असते का ??" या पुढे मी काहीच कारण विचारू शकतच नव्हतो. कारणे, स्पष्टीकरणे देणे हे तिला आता पर्यंत कधी पटलेच नव्हते. आयुष्या च्या परीक्षेत सगळे च प्रश्न "कारणे द्या" अश्या स्वरूपात नसतात. काही प्रश्नाची उतरे ही चूक की बरोबर अशीच द्यायची असतात. तिचे मात्र साधे सोपे सिद्धांत होते जे आहे ते असे आहे, उगाच उलटे सुलटे काही तरी करून सिद्धांत सोडवणे कधी पटलेच नव्हते.
ते शेवटचे दिवस इतके भर भर निघून गेले होते जसे पुराचे पाणी झप झप ओसरत जाते. आणि मागे सोडून जाते ते विखुरले आणि आस्था व्यस्त पसरलेल्या आठवणीचे साम्राज्य! आणि मी मात्र काहीच करू शकत नव्हतो. वपुंचेच खरे "सुखाचे क्षण हे पाऱ्या प्रमाणे असतात हातात आलेसे वाटतात तेव्हा निसटून गेलेले असतात"
आज तिचा मेल आला होता मला बर्थडे विश करणारा "विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे" या व्यतिरिक्त दुसरे काहीच लिहिले नव्हते कारण आता ती तेवढेच देऊ शकत होती ...