शब्द!

हास्य.. एक चिरंतन हास्य..
हास्यच आणेल तुजला समीप माझ्या
कळू देऊ नकोस जाणे तुझे
कारण तेच आणेल पाणी डोळ्यात माझ्या

दुनियेने घालविली रया
नवे पर्व सुरू करूया
आजच्या आज...
प्रियतमे...
तुजला नेहमी असेच वाटे
माझे हरेक शब्द असती खोटे....

खरंतर... शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

गोड शब्द असोत तुझे चिरंतन
कर त्यांना तू मजला अर्पण
अन् माझा जीव आहे तुझी साठवण
प्रत्येक प्रसंगी असो माझीच आठवण

तुजला नेहमी असेच वाटे
माझे हरेक शब्द असती खोटे....

खरंतर.... शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला

दुनियेने घालविली रया
नवे पर्व सुरू करूया
आजच्या आज...
प्रियतमे...
तुजला नेहमी असेच वाटे
माझे हरेक शब्द असती खोटे.....

खरंतर.. शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

शब्द आणि केवळ शब्दच गं...
आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी

-ऋषिकेश

टिपः गाणे कोणत्याही विशिष्ट चालीत नाही   काही ओळी मुळ चालीत बांधता आल्या.. पण संपूर्ण गाणं नाही  

 विनंती :

१. हे कोणत्या इंग्रजी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया प्रतिसाद उघड करा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, कृपया बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा.... (नाहीतर उत्तर कळल्यावर भाषांतरातील चुकांवरच जास्त चर्चा होईल  )
४. नुसते अभिनंदन करू नका  गाणे ओळखण्याचाही प्रयत्न करा. माझाही पहिलाच प्रयत्न असल्याने चुका नक्की असतीलच, त्याही सांगा. मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे, हे सांगणे नलगे