हे तुझे हासणे...

एक नवीन प्रयोग .....

स्व. रफींच्या स्वरातलं  नितांतसुंदर गीत " ये मुझे देखकर आपका मुस्कराना..."  आपण ऐकलं आहेच.

त्याच्या पहिल्या कडव्याचं भाषांतर करायचा माझा प्रयत्न खालीलप्रमाणे :

 " हे तुझे हासणे, गं मला पाहताना...

   ते प्रेम नव्हे तर, मग काय आहे ! "

थोडा खटाटोप करून मूळ चालीवर म्हणू शकलो. खरा पश्न पडला पुढच्या कडव्यांच्या रुपांतराचा , आणि त्याकरिता मनोगतावर धाव घेतली.

जरुर भासल्यास वरील ओळींतही बदल करून हे गीत संपूर्ण अनुवादित होउ शकेल काय ? चालीवर जमलं तर उत्तमच !

मनोगती हा प्रकल्प मनावर घेतील, अशी खात्री आहे.

आगाऊ धन्यवाद व शुभेच्छा !