संसाराची सप्तपदी
अरे संसार संसार ,मालिकांच्या काट्यावर
सारेगमपसारखा सूर आणि तालावर (१)
अरे संसार संसार, साता जन्माच्या गाठींचा
खेळ हा तर संचिताचा आणि ऊनपावसाचा (२)
अरे संसार संसार ,कधी वादळ वाटेवरचा
काटा रूते कुणा जरी तरी आहे भटकंतीचा(३)
अरे संसार संसार,असंभवही घडण्याचा
भाग्यविधाता परी गुंफी धागा त्यात एक सुखाचा(४)
अरे संसार संसार,गोजिरवाण्या ह्या घरात
वहिनीसाहेब उभी आहे सोनियाच्या उंबऱ्ऱ्यात (५)
अरे संसार संसार,चार दिवस सासुचा
अभिलाषा ठेवा थोडि नंतर होममिस्टरचा (६)
अरे संसार संसार ,अवघाची हा संसार
या सुखांनो या घेऊन आभाळमायेची पाखर(७)
अलकाताई.
मनोगतावर मी आजपासून सुरू करत आहे.
चुकांची श्क्यता आहे.