एकांताच तळं

एकांताच तळं
आठवणींनी साचलेलं.
जळही त्याच निश्चल झालेलं
जणू काही तृप्त होउन पहुडलेलं....
ना एखादं फुलणार कमळ,
ना एखादी येणारी जाणारी नाव.
एकही न फिरणारी मासळी
डोकावल्यावर दिसे एक काजळी.
एकांताच तळं
शांत,निस्तब्ध,नि:शब्द........

कोण्या एका दिशेतून वारा येतो,
हळूच शीळ वाजवत गातो.
तळ्यावर टिचकी मारतो
तळं थोडं थरारतं.
"तळाच’ थोडं तळ्यावर येतं.
कधी नव्हे ते..
’’तळालाही थोडं आकाश दिसत".

वाराही मग एक गिरकी घेतो
तळ्याला तळापासून हालवून टाकतो.
लाटांवर लाटा येतात.
"तळातल्या" आठवणी "तळ्यात" तरंगतात.
सारं कसं एकमेकांत मिसळून जातं.
तळ्याच पाणी गढूळ बनतं.

कुठलं तळं ? कुठला वारा?
एकांताच्या ’छेदल्या’ तारा.
’वा-याच्या जाळात एकांताच तळं,
तळ्याच्या जळात वा-याच जाळं’

मुक्ता