पदवीधर मतदारसंघ

      बहुतेक सुजाण नागरिकांना विधानसभा मतदारसंघ व लोकसभा मतदारसंघ म्हणजे काय, याची कल्पना असते. काही जण मतदानही करतात. 
     पदवीधर मतदारसंघ नावाचा आणखी एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाशी संबंधित निवडणुकांची माहितीही प्रसिध्द होत असते.
     हा मतदारसंघ म्हणजे नक्की काय ?
     या मतदारसंघाशी संबंधित निवडणुका किती वर्षांनी होतात ?
     त्याची नागरिकशास्त्राच्या पुस्तकात माहिती असते का ?
     या मतदारसंघात सामील होण्यासाठी कोणती अर्हता आवश्यक आहे ?
     या मतदारसंघाने निवडून दिलेल्या आमदारांना कोणते अधिकार असतात ?
     या आमदारांचा राज्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो का ? पर्यायाने, राज्याच्या विकासात यांचा वाटा असतो का ?
     

     तज्ज्ञ मनोगतींनी जिज्ञासापूर्ती करावी.