प्रिया आज माझी

कवी यशवंत देव ( आणि अर्थातच माझी प्रिया) यांची क्षमा मागून .

प्रिया आज माझी नसे ताप द्याया
नको बंध सारे नको टोचण्या त्या

नको धास्ती आता कशा घाबरू मी
हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही
सुरेवीण का रात्र जाईल वाया

जुने मित्र येता घरी बार होतो
सुखे घोट घेता कुणी पार होतो
पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या

न भिती जीवाला न प्राणास घोर
कसा आज ओठात खेळेल धूर
निळी चंद्रिका मित्र संगे पहाया

अशा रंगविता मनी स्वप्नराती
मधु मल्लिका माधुरी स्वप्नी येती
कशाला उभी ’ती’ मधे भंग व्हाया