मत

नको सत्ता, नको दौलत
हवी  केवळ तुझी सोबत

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...

नको तो मोह स्पर्शाचा
पुढे जाऊ चुका टाळत 

कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली  'गंमत'

कधी होणार तू माझी ?
-- कळू दे ना तुझेही मत !

- केदार पाटणकर