प्रेरणा : आमचे प्र तिभासक्त डोळे दिप वणारी एक कूल कविता जिने आमच्यावर करणी केली. चाणाक्ष वाचकांना अधिक सां न ल.
...................................................
मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी ...!
...................................................मी खोडसाळशी घेऊन आलो वाणी !
मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी !ओढून इथे मज कुणी आणले नाही
राहण्यास आलो, शिकार करण्यालाही...
स्वादिष्ट खाद्य मज मिळेल याच ठिकाणी !आनंद कवींना निखळ मिळू ना दिधला...
दुग्धात विडंबनखडा प्रत्यही पडला
वाचून तयांची सूरत उदासवाणी !साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ?
कविकुळात कोणी नाव न माझे घाली...
प्रतिसादयाचना केली केविलवाणी !प्रेयसी ही किती किती समंजस माझी...
ही शांत राहते...सखी भेटता माझी
चोंबडी सखीही झाली आज शहाणी !काहूर आतल्या आतच माझ्या दाटे...
वातूळ अन्न उदरात करी बोभाटे !
यापुढिल ओळखा तुम्हीच कर्मकहाणी !सावळीच आहे बरी...सोबतिण माझी
रात्रीत येतसे...घरा सोबतिण माझी
आवाज न करता...येते ती अनवाणी !वेशीवर माझी लाज मीच का टांगू ?
मी काय, कुणाला, कशास आता सांगू ?
अळिमिळी गुपचिळी, साऱ्यांचीच कहाणी !मी कवींस छळण्यासाठी गातो गाणी...!
...................................................
- खोडसाळ
...................................................लुडबुडकाल : १५ फेब्रुवारी २००८