पाहीला ना आचार, केला ना विचार, लावले पणाला मी प्राण

पाहीला ना आचार, केला ना विचार, लावले पणाला मी प्राण

पाहीला ना आचार, केला ना विचार, लावले पणाला मी प्राण
चरणांठायी तुझ्या, होवो देहावसान, हीच मनीची मनीषा

मिटून जाईन, मरून जाईन, काम काही करून जाईन
संपून ही संतोष ना, लाभला तर मी जाऊ कुठे

अपराधी कोण सांगवेच ना, चुपही मज राहवेचना
पाखरू कोण, कोण पारधी, काही सये बोल ना

निघालो घरून घेऊन शपथ, सोडेन ना पाठलाग अन
घेऊन प्राण तळहातावरी, आलो मी होऊन खुळा

नरेंद्र गोळे २००८०२२१

टीपा:

१. ही कविता कुठल्याशा हिंदी गाण्याच्या चालीत म्हणता येत असेल तर तो योगायोग समजावा.
२. ह्या कवितेवर प्रच्छन्न प्रतिसाद देण्याची मुभा आहे.