अंतरास जाळते व्यथा मनातली
सांगतो कथा प्रिये तुला मनातली
पाहुनी कुणास रोज जीव धडधडे
ही कुणा कळेल का नशा मनातली?
शोधतो चहूकडे मी सारखे तुला
सांग ना सुखा तुझी दिशा मनातली
सागरा समान दु:ख काळजात या
ही न पेलवे मला कळा मनातली
आणलीत माणसे जगात तू तुझ्या
तार मात्र तोडली मना -मनातली
---- स्नेहदर्शन {धुळे}{९२२६८६७१५७}