संध्या-छाया (६०+)

                   संध्या-छाया (६०+)

आता झाली आयुष्याची, रम्यशी सायंकाळ,

निसटलेले क्षण जगण्यासी निवांत असा हा काळ .

आठवणींच्या शिंपल्यामधले, मोती आता वेचावे,

ताण-तणावा दूर सारुनी छंदही जोपासावे.

वाचन-चिंतन अध्यात्म्याची थोडी भरावी गोडी,

धकाधकीच्या दिनक्रमांतूनी सवड काढावी थोडी.

शरीर संपदा आहे जोवरी,पर्यटनाला  निघा तोवरी,

निसर्गाच्या कुशीत शिरुनी ,शिळ्या मनाला आणा उभारी.

मोहपाश अन मायाजाली, फार आता न गुंतावे,

उरल्या आयुचे अमूल्यक्षण जरा,स्वत;साठी वेचावे,

जरा स्वत;साठी वेचावे.

अलकाताई.