जेथे बघेन तेथे डोळ्यांस स्वप्न दिसते
फटकावले मला की भार्या प्रसन्न दिसते...
आहे खरी अवदसा ही वेगळीच दृष्टी !
का लागलीच कविता मज मात्र भिन्न दिसते...?
जेव्हा लिहून बघतो, जग हासतेच वेडे
जेव्हा पडीक असतो, जग खिन्न-खिन्न दिसते...
मी गुत्त्यामध्येच इतकाइतका रमून जातो;
उधळीत रंग माझे, मज सर्व नग्न दिसते...
"हणतोच", तो म्हणाला, मी ऐकलेच नाही
मी एकटाच आता, अन सर्व सुन्न दिसते...
मी लेखनास आता पेल्यात बंद केले
कोणी किती म्हणू दे "मडकेच भग्न दिसते"...