(एका माळेचे मणी)

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी
 
शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले

प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले

लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले

जे सभा भुंकून गेले आकसाने
बाहुले भलत्याच, चावीचे निघाले

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले
ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !!

शिंपडा गोमुत्र आता तातडीने
'देव' हे भलत्याच जातीचे निघाले

(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
"केशवा" हे काव्य टोळीचे निघाले...)