झटपट ढोकळा

  • १वाटी डाळीचे पीठ
  • तेल,मीठ चवीनुसार,साखर,हिन्ग
  • लिम्बाची पावडर
  • खायचा सोडा,खोबरे,कोथिंबीर
३० मिनिटे
२ जण

१. १वाटी डाळीचे पीठ घ्यावे.
२. त्यात १ चमचा तेल, साखर, चवीनुसार मीठ, चवीनुसार लिम्बाची पावडर घालावी.
३. मिश्रण चांगले हलवून घ्यावे.
४. कुकर च्या भांड्याला तेलाचा हात फिरवून घ्यावा.
५. मग तयार मिश्राणात खायचा सोडा घालून मिश्रण फेटून घ्यावे.
६. सोड्यामुळे पीठ फसफसून येते.
७. लगेच कुकरच्या भांड्यात टाकावे.
८. कुकर ला शिट्टी न लावता १२-१५ मिनीटे उकडुन घ्यावे. उकडलेल्या पीठत जर चमचा टाकून ते पीठ चमच्याला चिकटले नाही
    तर पीठ छान उकडले असे समजावे.
९. ढोकळा गार होवू द्यावा.
१०. फोडणी तयर करावी. तेल टाकून त्यात मोहरी आणि हिंग घालून ती फोडणी ढोकळयावर पसरावी.
११. खोबरे,कोथिंबीर टाकून सजावट करावी.आणि त्याचे छान काप करावेत.

झटपट ढोकळा तयार आहे !!! सोपा ही आणि करायला वेळ पण कमी लागतो.

१. खायचा सोडा पावडर स्वरुपात न टाकता तोच सोडा थोड्या पाण्यात मिक्स करून टाकला कि ढोकळा अजूनच हलका येतो.
२. हळद वापरू नका शक्यतो. तळलेल्या हिरव्या मिरची सोबत तर चव जास्त खुलते.
३. वेळ कमी लागत असल्याने पाहुणे आले तरी पटकन करता येतो.
४. आल-लसुण पेस्ट मी तरी टाकत नाही.

अर्थातच माझी आई.