ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते,
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते!
क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा
त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते!
बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी
मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!!
हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे
धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!!
आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा
अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!!