सांगाल का ?

गाईले अधुरेच गीत मी, तिला सांगाल का
राहिलो जगास भीत, एवढे कराल का

हा भरुन आसमंत, मंद वाहतोय गंध
असेल ती कुठे इथेच, ठाव तो दावाल का

रातराणिच्या फुलांस, बहर आज येत खास
गेली कोणत्या दिशेस ती ,मला सांगाल का

जागता तिचेच भास, स्वप्नांतुन तोच ध्यास
भेटताच ती उद्यास, जाण तीस द्याल का

ह्या टिपूर चांदण्यात, जागलो पहात वाट
होतसे अता पहाट, तिज निरोप द्याल का