साथ देण्याचे जर का तू करशील कबूल

साथ देण्याचे जर का तू करशील कबूल

साथ देण्याचे जर का तू करशील कबूल |
मी असाच धुंद गीतांचे गुंजन करीन ||
तू मला पाहुनी मत्त, हसतच राहा |
मी तुला पाहुनी गीत गातच राहीन || धृ ||

रूपसौंदर्य उपवनी विखुरले जरी  |
आजवर साद कोणाही मी ना दिली ||
पाहिले ग तुला मग हे नयन बोलले |
रूप सोडून तुझे दूर होऊच नये ||
नजरेपुढतीच जर का तू राहशील तरी |
हरक्षणी नजरानजरीस 'खो' मी देईन || १ ||

स्वप्नी वर्षानुवर्षे मी जशी तासली |
तू तशीच मूर्ती संगमरवरी आहेस ||
तू मला मान ना भवितव्यच तुझे |
मी तुला मात्र भाग्यच माझे म्हणेन ||
जर का तू समजू लागशील आपला मला |
मी बहारीच्या मैफलीस रंगत आणीन || २ ||

एकटा मी कधीचाच चालत आहे |
आता जीवनाचा पथ सरतच नाही ||
जोवरी संग रंगीत ना सोबत असे |
काळ हा यौवनाचा सरतच नाही ||
जर का तू सोबतीने चलशील तरी |
मी भुईवरती तारे पसरत चलेन || ३ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००८०३२६

हा कुठल्या मूळ हिंदी गीताचा अनुवाद आहे?
गीतातल्या मूळ भावना अनुवादात पुरेशा व्यक्त होत आहेत का?