विडंबन

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता

म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता

रोज नवऱ्यांनो, अता ऱ्हावा उपाशी
बायकांनी काढला आदेश आता

एकही ना ठेवला खात्यात पैसा
आणि बचतीचा मला उपदेश आता

सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची
राहिला नाही मला आवेश आता

घास उतरावा कसा खाली घशाच्या?
काल चे सारे, न काही फ्रेश आता

सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी
सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता