तू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे

तू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे

तू इथे प्रवासी अन् हा निवारा जुजबी आहे
जीवनाचे पाहुणपण चार दिसासाठी आहे
स्थावर आणि जंगमही काही ना सवे जाईल
रिक्तहस्त तू आलास, रिक्तहस्त तू जाशील
जाणूनही अज्ञानाचे तू वेड पांघरशी
क्षणभंगूर आयुष्याचाही गर्व बाळगशी
कसा कसा तू गुरफटसी, जत्रेतही संसारी
भवसागरी बुडता तू ईश्वरासही भुलसी
आजवरी दिसले हे, गमावतो पावणाराही
जीवनास जो समझे, रडतो जीवनावरही
नश्वर दुनियेवर विश्वास, का म्हणून, करशी
अखेर काय समजुन तू, प्रेम जगावर करशी
आपल्याच काळजीत, जो जगतो, गुरफटतो \- २
वास्तवात जीवन हे, काय कोण ओळखतो \- २
आज समज तू
आज समज तू ही संधी ना उद्या पुन्हा येईल
झोपणार्‍या बेसावध, दचकशील, धोका खाशील

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३२१

जीवनविषयक तत्त्वज्ञानावर गहिरे भाष्य करणाऱ्या ह्या मूळ हिंदी गीताने अगणित मनांवर चिरकाल राज्य केले.
तीन कडव्यांच्या मूळ गीतातील केवळ एका कडव्याचा हा अनुवाद आहे. शीर्षकही मूळ गाण्याचे नाही.
 हे गाणे ज्याने लक्षपूर्वक ऐकले आहे तो हे कधीच विसरू शकणार नाही.
म्हणूनच, कुणीतरी हे निश्चितच ओळखेल असा मला विश्वास वाटतो.

मात्र, आजवरच्या कूटप्रश्नांतील कदाचित हा सर्वात अवघड प्रश्नही ठरू शकेल.

तेव्हा ओळखा बरे मूळ हिंदी गीत.