ऐकून जा ना हृद्-कथा

ऐकून जा ना हृद-कथा

येते आठवण रे तुझी, तुटत्या ताऱ्यांच्या सवे
ऐकते चाहूल तुझी, गुपचुप नजरांनी रे
सर्द हवा, अंधार रात, सांगते कथा रे तुझी ही
बेचैन हे तुझ्यासाठी रे, धडकते हे यौवन पाहा
हृदयात वलये धूराची पाहा, ऐकून जा ना हृद्-कथा

लाटांच्या ओठी ह्या हरल्या कहाण्या
फुलागत आशेच्याही हरवल्या शोकांतिका
पत्ता तुझा शोधू कुठे साऱ्याच जागा रिकाम्या
जाणे कुठे जाऊन गडप झाले हे जगच आपले
आशेचे नाहीसे झाले जगच, ऐकून जा ना हृद्-कथा

झाडांच्या फांद्यांवर विसावलेसे चांदणे
तुऽझ्याच विचारांत गुंतलेले चांदणे
आणखी थोड्या वेळातच कंटाळून परत फिरेल
रात्र ही बहारीची, ना पुन्हा कधी असेल
दो-एक क्षण फक्त मिळतील अजून, ऐकून जा ना हृद्-कथा

लाटांच्या ओठांवर विलंबित राग हा
सर्द ह्या हवेमध्ये थंडगार क्षोभ हा
ह्या धगीत हव्या हव्या, तू ही तळमळून पाहा
जीवनाच्या गीताचा वेग बदलुनी पाहा
ह्या उमटू दे स्पंदनांची कथा, ऐकून जा ना हृद्-कथा

सरता वसंत आहे, चढते आहे यौवन
ताऱ्यांच्या सावलीत, घडती कथानकं
एकदा परत गेले, जर तुला ते बोलावून
येतील ना फिरून ते, काफिले बहारीचे
ये अजूनही, ही जिंदगी आहे युवा, ऐकून जा ना हृद्-कथा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०४२०

हा अनुवाद धृवपदाविनाच दिला आहे. म्हणूनच शीर्षकही मूळ गीताचे नाही.

ओळखा बरे हे सदाबहार मूळ हिंदी गीत.