तुझे माझे, माझे तुझे, प्रेम आहे

तुझे माझे, माझे तुझे, प्रेम आहे

तोः
हा मौसम रंगीन गमे ।
थांब जरा गं प्राणप्रिये ॥
तुझे माझे माझे तुझे प्रेम आहे ।
तर उगाच का लाजावे ॥ धृ ॥

तीः
थांबेन मी ही प्राणप्रिया ।
माझीही मुळीच नाही ना ॥
तुझे माझे माझे तुझे प्रेम खरे ।
पण होवो न त्याची गाथा ॥ धृ ॥

तोः
हा चंद्र आणि हे तारे ।
म्हणती मिळून सारे ।
ये ग प्रेम करू ॥
तीः
हा चंद्र कसा बघ बघतो ।
मग सांग कशी मी देऊ ।
रे होकार तुला ॥
तोः
मनी एक, बोल ते दुजे ।
प्रेम हेच ग प्राणप्रिये ॥ १ ॥


तोः
प्रेमाच्या लांबच वाटा ।
हातात घेऊनी हाता ।
कुठे दूर चलू ॥
तीः
हे कर्मठ दुनियावाले ।
वेढून बसलेले सारे ।
पहा जळती कसे ॥
तोः
जळती तर जळू दे सारे ।
थांब जरा गं प्राणप्रिये ॥ २ ॥


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५१९ बुद्धपौर्णिमा



शब्द लोभस आहेत. गायक छानच गायले आहेत. मात्र ह्या गाण्याच्या शब्दांत काहीही अपूर्व नाही.
आहे ते ह्या गाण्याच्या संगीतातच.
म्हणून उत्तर कळले तरीही, एकदा पुन्हा हे गाणे ऐकून घ्या.
उत्तर कळणार नाही त्यांनी ते कळल्यावर, गाणे अवश्य ऐका.
शीर्षक अर्थातच मूळ नाही.

आता हे मूळ हिंदी गीत तर ओळखाच. शिवाय ह्या सदाबहार संगीताचा रचयिताही.