इथेच कुठे मन आहे, पायतळी येवो ना
पैंजणवाले जप जरा ।
लचकत, मुरडत, चाले कामिनी ।
दिपवत, चमकत, चपळ दामिनी ॥
वो बावळी, ओ सावळी, अगं ए चंचल ।
क्षणभर, थांब ना, थांब ना, थांब ना ॥
पैंजणवाले जप जरा । इथेच कुठे मन आहे ।
पायतळी येवो ना ॥ धृ ॥
जशी दामिनी ती, मेघांतून उडे ।
थोडी चाले पुढे, हलकेच वळे ॥
उचल ए, नयन तव काळे ।
पण एवढे पाहा की, कुणाची लागे हाय ना ॥ १ ॥
कुठे जाशी अशी, मदिराशी पिऊन ।
मदमस्त पवन, पदरात भरून ॥
आहे सारे, जगच मस्तीभरे ।
पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना ॥ २ ॥
कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे ।
फिरकी ही माझी, तुझा नाच बने ॥
नाच ना, बनून चकोरी ।
घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना ॥ ३ ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५१६
गाण्यातील नाचाची फिरत शब्दांमधूनही व्यवस्थित व्यक्त होते, हे मूळ हिंदी गीतकाराचे वैशिष्ट्य आहे.
ओळखा बरे हे मूळ हिंदी गीत. शीर्षकही फिरवलेलेच आहे.