पुकार व महान

चित्रचाहत्या मनोगतींनो,
अमिताभच्या हिट चित्रपटांच्या यादीत पुकार व महान या चित्रपटांची नावे नसतात.
एका ठिकाणी वाचले होते की हे दोन्ही चित्रपट साफ कोसळले. आणखी एका ठिकाणी किंचित विसंगत असे वाचले होते की, हे चित्रपट विशेष चालले नाहीत पण त्यांनी निर्मात्यांची वसुली करून दिली.  
हे चित्रपट हिट चित्रपटांच्याच आगेमागे प्रदर्शित झाले होते. 
हे चित्रपट न चालण्याची, त्यांना कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे कोणती ?
त्यावेळचे वातावरण, चर्चा कोणाला आठवत असल्यास जरूर लेखन करावे.