माझी केवड्याची प्रीत, तुझे हात चंदनाचे ,
गर्द हिरव्या मेंदीत,फुले गीत श्रावणाचे !
तुझी कांती सोने-रुपे,तुझा श्वास मोगऱ्याचा ,
तुझ्या एका श्वासापरी,होवो वर्षाव मरणाचा !
तुझ्या निळ्या डोळ्यात, धुंद आभास दाटला ,
अन मिटता पापणी,चक्क सागर आटला!
तुझ्या ओठांचे पराग,त्याचा मादक वावर,
वीण रुजता रुजता,होई चित्त अनावर !
तुझ्या गर्द या केसात,माझा जीव हा गुंतला,
मन सावरू पाहता,चांद मातला !