एक प्रेमाचे गीत आहे

एक प्रेमाचे गीत आहे

एक प्रेमाचे गीत आहे,
प्रवाहाचा ओघच आहे ।
जीवन इतर काही नसून,
तुझी माझी कहाणी आहे ॥धृ॥

काही कमवून गमवायचे,
काही गमवून कमवायचे ।
जीवनाचा अर्थच तर,
येणे आणि जाणे आहे ।
दो घडीच्या जिण्यातून,
'जीवन' एक घडवायचे ॥१॥

तू प्रवाह नदीचा आहेस,
मी तर एक किनारा तुझा ।
आधार मला तू आहेस,
आधार आहे मीही तुला ।
डोळ्यांत समुद्र जणू,
पाणी आशांचे आहे ॥२॥

वादळ तर येणार आहे,
येऊन निघून जाणार आहे।
मेघच जणू पळभर हा,
झाकोळून जाणार आहे।
उरल्या सावल्याही आहेत,
राहीलेल्या खुणाही आहेत ॥३॥

मनाला दे समाधान,
तो सूर तू शोधून ये।
शेवटल्या श्वासाआधी,
आवाज तू घेऊन ये।
आनंदाची कांक्षा आहे,
अश्रूंचाही ओघच आहे ॥४॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६२०

मूळ हिंदी गीत ओळखा.