कोल्हापुरी मटण पांढरा रस्सा

  • अर्धा किलो मटण
  • वाटणासाठी-सुक खोबर अर्धी वाटी, ३-४ लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा, एक चमचा खसखस, २-३ मिर, १०-१२ हिरव्या मिरच्या, १ कांदा चिरलेला
  • २ चमचे आल लसुण पेस्ट.
  • १ अख्खा ओला नारळ.
  • चवीपुरते मिठ.
  • फोडणीसाठी-तेल,२ कांदे बारीक चिरलेले, तमालपत्र
४५ मिनिटे
४-५ जण

मटण स्वच्छ धुवून त्याला मिठ आणि आल-लसुण पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे.

नंतर प्रेशर कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.

त्यात तमालपत्र अणी बारीक चिरलेला कांदा घालावा. कांद्याचा रंग गुलाबीसर झाल्यावर त्यात मटण घालावे. थोडा वेळ झाकण ठेवावे. मटणाला थोड पाणी सुटल्यावर मटणाचे पीस बुडेपर्यंत पाणी घालावे अणी ४ शिट्ट्या काढाव्यात.

मटण शिजेपर्यंत वरील वाटणासाठी दिलेले साहित्य एकत्र करून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे आणि ओल्या नारळाचे दुध काढून घ्यावे. 

एका पातेल्यात तेल गरम करावे. नंतर त्यात वाटण घालून छान परतून घ्यावे. वाटण भाजल्याचा वास अल्यावर त्यात शिजवलेले मटण घालावे. नारळाचे दुध घालून १ उकळ येऊ द्यावी.

नारळाचे दुध काढण्याची कृती-

नारळ खऊन घ्यावा नंतर त्यात कोमट पाणी घालून मिक्सरमधून काढून फडक्यातून गाळून दुध काढावे. पुन्हा एकदा समान कृती करावी.

*कुठेही हळद व कोथिंबिरीचा वापर करू नये.

*तिखट हवे असल्यास जास्त मिरच्या घालाव्यात.

आई