दिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे

दिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे

(दिस हे बहारीचे, तुझ्या माझ्या पसंतीचे ।
ऊत्स्फूर्ततेने, ये तू, प्रेम करू ॥) /-२
दुःखं लाख संसारी ह्या, शत्रू जणू की प्रेमाचे ।
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे ॥ धृ ॥

(दुनियेचं ओझं तू, उतरव पाहू मनावरून ।
छोटेसे आयुष्य आहे, जगून घे, हसून तू ॥) /-२
आपले तर जीवनच, जगते मनाला मारुनच ।
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे ॥ १ ॥

(बरे नसते मुळी, स्वप्नांशी असे खेळणे ।
फारच अवघड असे, बघ वास्तवास झेलणे ॥) /-२
वास्तवास ह्या तुझ्या, माझ्या स्वप्नांवर ओवाळून ।
ऊत्स्फूर्ततेने, ये तू, प्रेम करू ॥ २ ॥

(विचार तू भलते सलते, काढून टाक मनामधून ।
जगायचे तर, नावेला, भर प्रवाहात लाव तू ॥) /-२
भर प्रवाहात असती, जप तू, गोते कमालीचे ।
ऊत्स्फूर्ततेने, प्रेम करावे कसे ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६११

या सदाबहार युगलगीतातील धृवपद व अंतऱ्यांतील पूर्वार्ध एक जण म्हणतो व उत्तरार्ध दुसरा.

मूळ हिंदी गीत ओळखा हे तर आहेच. शिवाय पूर्वार्ध कोण म्हणते हेही ओळखा. ती की तो?