'व्याकलन' भाग- दुसरा -"व्याकरणाची मांडणी"

टप्पा १)

व्याकलन वीशयावरची आधीच्या चर्चा थोडीशी तोंडओळख म्हणून उपयोगी आली. त्या चर्चेअंती खालील मूद्दे चर्चेच्या सर्वसामान्य नीयम म्हणून पूढे आले होते.

१) नव्या व्याकरणाच्या मांडणीची प्रस्तावकाकडून उदाहरणं दीले जावीत.

२) चर्चेत सहभागी होणार्यांनी चर्चेचं स्वरूप खेळकर पण तरीही वीशयाला धरून राहावं.

३) ज्या मूद्द्यावर 'एकमत' होईल त्या मूद्द्यावर 'एकमत आहे' असं कबूल करावं. (अहो! नाहीतर मला कसे कळेल तूम्ही वाचले व तूम्हाला कळले की नाही ते. )

४) जीथं 'दूमत' आहे, 'मतांतर' आहे, ते स्पष्टीकरणासह ते 'मत' मांडले जावे. (व त्यापाठोपाठ प्रश्नांच्या/ शंका-कूशंकांच्या गोळीबाराला सामोरे जावे. ) जेणेकरून नवीन गोष्ट देखील समोर येवू शकते.

टप्पा २)

भाषेचं  व्याकरण हे अदृश्य असते. कागदावर पद्धतशीपर पणे जी मांडली जाते ती असते 'व्याकरणाची मांडणी'. भाषा काळानूसार - स्थलानूसार बदलते. भाषा बदलली म्हणजे व्याकरण ही बदलते. आता ते कसे?

उदाहरणः-

मी एक सामान्य (हौशी) अभ्यासक आहे. माहीतीचा खजीना माझ्याजवळ नाही. पण तीक्ष्ण आकलनशक्ती व सूंदर कल्पनाशक्ती च्या जोरावर मी 'व्याकलनाची मांडणी' ही संकल्पना मांडत आहे. तूमच्याकडे माहीतीचा खजीना असल्यास मला जरूर साथ द्या वा ही संकल्पना तूम्ही ही स्वीकारा, वाढवा.

छत्रपती शीवाजी महाराज यांनी बाजीप्रभू देशपांडे यांना १३ मे १६५९ रोजी पाठवीलेल्या एक पत्र पूढील प्रमाणे. :-

"तिस खमसैन अलफ जसलोडगड हिरडस मावलमध्ये आहे. तो उस पडला होता याचे नाव मोहनगड ठेउन किला वसवावा यैसा तह करूनू किल्ल्यास मसुरलअनाम पिलाजी भोसले यासी किले मजकूरचा हवाला देउनू पाठविले असेत.. "

आजच्या काळातील लीखीत पद्धतीने वरील वाक्य (ढोबळ भाषांतरात) सांगायचं झालं तर असे होवू शकते:-

'तिस खमसैन अलफ जसलोडगड हा हिरडस मावळात आहे. तो ओस पडला आहे. त्याचे नामांतर 'मोहनगड' असे करून तो किल्ला म्हणून वसविला जावा असे नमुद केलेली राजकिय कागदपत्रे बनविली गेली आहेत. श्री. पिलाजी भोसले यांस राजपत्राचा हवाला देवून तिथं पाठविले जात आहे. "

आता आपण इथं आळखू शकता की सन १६०० ते २००८ या कालावधीत शब्दयोजना व वाक्यरचना यांमध्ये कीती फरक पडला आहे. पण तरीही ती मराठी भाषाच होती हे आपण ठामपणे म्हणू शकतो कारण स्पंदन एकच आहेत. स्पंदन बदलली की भाषा बदलत असावी.

लीखीत स्तरावर मराठी भाषेत अमूलाग्र बदल इंग्रजांनी 'मराठीप्रदेशात' शीक्शणाचा प्रसार सूरू केला तेव्हा पासून झाला. वाक्यरचने बाबत म्हणायचं झालं तर ऍक्टीव वॉईस, पॅसीव व्हॉईस, डायरेक्ट स्पीच, इन-डायरेक्ट स्पीच ही व्याकरणांची मांडणी आपल्याला इंग्रजी भाषेनेच शीकवीली. (व त्याकाळात ते ही मराठीतून काहीना काही शीकले असतीलच. ) तत्पूर्वी अशा वाक्यरचना मराठीत बोलल्या गेल्याच नसतील असे नाही पण त्यांना मराठीच्या व्याकरणाच्या अळ्यात आणणं व ती वाक्यरचना सामान्य जनतेपर्यंत शीक्शणाच्या माध्यमातून पोहचवणं इंग्रजीच्या प्रभावाने, व इंग्रजांच्या रेट्यानेच शक्य झाले. मूळात इंग्रजांनीच मराठीच्या व्याकरणाचा पाया रचला असं म्हणणं वावगं होणार नाही. शालेय शीक्शणातून त्याचा प्रसार केल्यामूळे मराठीचा, संस्कारीत मराठीचा प्रसार महाराष्ट्रात झाला. तेव्हापासून पूण्याची 'बोलीभाषा' केंद्रवर्ती मराठी झाली.

वरील वीवीध वाक्यरचनांमूळे मानसीकता बदलत गेली, सूधारत गेली. पण त्यानंतर ज्ञान देणार्यांच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा आगाऊपणा अजाणतेपणामूळे या मातीतील मराठी नेत्तृत्वाने करण्याचा जो प्रयत्न केला गेला तो नीयतीने हाणून पाडला. अहींसावादी गूजराती समाजातील एकाला 'राष्ट्रपीता' म्हणून सन्मान मीळाला. व त्याच बरोबर नीयतीने ईतीहासाच्या पूस्तकात 'राष्ट्रपीत्याला', राष्ट्र म्हणून ज्यांनी जन्म दीला अशा (इंग्राजांनाच) बापालाच गोळी घालणार्यांचा (प्रतीकात्मक) 'अपमान' एका मराठी भाषीकाला देऊ केला.

आता पाहूया नवी व्याकरणाची मांडणी कशी असू शकते याचं संस्क्शीप्त उदाहरणं:-

 व्याकरण जे अदृश्य असते त्याचे वीश्लेशण करण्यासाठी वीवीध स्तर व वीवीध पद्धती असतात. ह्या भागात आपण फक्त वीवीध स्तरांची सारांशामध्ये ओळख करून घेवूया.

व्याकरण वीश्लेशण दोन स्तरावर होतं

१) नीम्नतम सूक्श्म स्तर

२) उच्चतम ब्रहद स्तर

सूक्श्म स्तरावर व्याकरणाच्या वीश्लेशणाचे काही प्रकार पूढीलप्रमाणे:-

१ = कर्ता

अ} प्रत्यक्श रूप >१ ) कर्ता २) करवीता

ब} अप्रत्यक्श रूप > १) नाम २) वीशयनाम ३) अनूल्लेख

२ = वीशेषण

३ = क्रीयावीशय

४ = माध्यम

५ = कर्मवैशीष्ठ

६ = क्रीयापद

७ = अर्थपद

उदाहरण = राम आंबा खातो.

प्रचलीत व्याकरण मांडणी = राम > कर्ता, आंबा > कर्म, खातो > क्रियापद

संभवीत व्यावरण मांडणी = राम > प्रत्यक्श कर्ता, आंबा > क्रीयावीशय, खा_ > क्रीयापद,   _तो > अर्थपद (काळ व लींग दर्शक)

उच्चतम स्तरावर व्याकरणाच्या वीश्लेशणाचे काही प्रकार पूढीलप्रमाणे:-

यांमध्ये वाक्यांचा वीचार केला जातो. वाक्यांचे प्रयोग खालील प्रमाणे असू शकतात.

उल्लेख :-

1 ) थेट उल्लेख  (Atvive Voice) 

2 ) अप्रत्यक्ष उल्लेख (Passive Voice)

रचना :-

1 ) थेट रचना (Direct Speech)

2 )अप्रत्यक्ष रचना (Indirect Speech)

त्यांचे प्रत्येकी दोन प्रकार पुढील प्रमाणे-

कर्म प्रधान - ज्या वाक्यात क्रीयेला/ कृतीला महत्त्व दीले गेले असते ते 'कर्मप्रधान वाक्य'.

भाव प्रधान - ज्या वाक्यात क्रीयेच्या/ कृतीच्या वीशेषतेवर भर दीला गेलेला असतो ते 'भावप्रधान वाक्य'.

कर्म प्रधान - त्याने पुस्तक वाचले.

भाव प्रधान - त्याने इतिहासाचे पुस्तक वाचले कींवा त्याने गादीवर लोळत पूस्तक वाचले. कींवा त्याने डूलक्या घेत पूस्तक वाचले.

व्याकलनाचा मूख्य उद्देश्य हा समोरची व्यक्ती काय म्हणतेय तसेच तीला काय सागायचे आहे हे ओळखता येणं असा असायला हवा. येथे मूख्य फरक संस्कृतीचा आहे. इंग्रजी भाषेच्या व्याकरणाची मांडणी 'फक्त आपल्याला काय सांगायचे आहे' हे सांगण्यासाठी योग्य आहे पण त्या सोबत मराठी माणसाचा गूण सांगणारी दूसर्याला समजून घेणारी, 'कर्मप्रधान व भावप्रधान' ही संकल्पना मराठी व्याकलनात संन्मीलीत केली तर जावी असे मला वाटते. भाव व्यक्त करणार्या व्याकरणाच्या मांडणीकडे ही लक्ष दीले जावे. जर वर दाखविलेल्या पद्धतीचा अवलंब केला तर मराठी बरोबरच इंग्रजीचे व्याकलन ही सोपे होईल व एकांगी दृष्टिकोनही टाळला जाईल.

आता पूरता एवढं पूरे! चला सूरू करा 'गोळीबार'......