माझा गोरा रंग

माझा गोरा रंग घे घे

मज सावळा रंग दे दे

रात्रीत लपून जाईन

मज प्रियाचा संग दे दे.....

मज रोखितसे लज्जा

परि मोह ओढी मजला

जाऊ कुठे न कळे

मज कोणी ते सांगू दे............

ढगाआड लपून चंद्रा,

चोरून डोकावी चंद्रा

तुज राहू भासे वैरी

हसूनी माझा जीव जाळीताहे.......

काही गमावलंय कमवून

काही कमावलंय गमवून

माझं मन कुठं चाललंय

मज वेडंपिसं बनवून..............

मंडळी, गेल्या वेळेला तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून पुन्हां प्रयत्न करावासा वाटला्. हे गोड गाणे तुम्ही सहज

ओळखाल यात शंकाच नाही. पण तुमच्या प्रतिसादामुळे खूप आनंद होतो.