[त्याच्या रचना]

आमची प्रेरणा - माझ्या रचना

गरुड नाही, कावळ्याची झेप आहे
पुनपुनः ही वाजणारी टेप आहे

पायवाटेचा चिखल उडवीत येसी
बस,  महामार्गास हा आक्षेप आहे

कोवळ्या वाचून झाल्या सर्व रचना
झोंबरा प्रतिसादरूपी लेप आहे

वाचताना काव्य मी विव्हळू किती रे?
काव्य कसले, काफियाविक्षेप आहे!

ही रदिफ, हा काफिया अन् ही अलामत
गझल नाही, फक्त तैसा 'शेप' आहे

हे विडंबन आणि टीका व्यर्थ सारे
खोडसाळा तो तवा निर्लेप आहे...