गाऱ्हाणे मृत्यूशी ना, मला जीवनाने छळले

गाऱ्हाणे मृत्यूशी ना, मला जीवनाने छळले

ही गझल नाही, न हे गीत आहे कुठले |
ही तर माझ्या दु:खाची कहाणी आहे ||
माझ्या छातीत निखारे केवळ |
माझ्या डोळ्यात फक्त पाणी आहे ||

कधी दीनतेने छळले |
कधी लाचारीने छळले ||
गाऱ्हाणे मृत्यूशी ना |
मला जीवनाने छळले || धृ ||

नशीबावर काही |
जोर चालत नाही ||
तो ऋतू आहे हा |
जो मुळी बदलत नाही || १ ||

कधी होती बदनशीबी |
कधी होती मम गरीबी ||
कुणाकुणाचे नाव घेऊ |
मला प्रत्येकाने छळले || २ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०१२५

मूळ हिंदी गीत ओळखा.