केवढा काळोख...

केवढा काळोख आहे माजलेला
सूर्य या शहरात दिसतो गोठलेला!...

मी लढाया लागलो; नव्हता इलाजच
दोर तर आधीच होता कापलेला...

दुःख हलके वाटले इतके मला का?
भार होता मी सुखाचा पेललेला...

जायचे होते मला का तरिही पुढे?
माहिती नव्हता कुणी मज परतलेला...

हात कोणाचा धरू आता 'अजब' मी?
हात माझा आज आहे पोळलेला...