प्रेमकलह

प्रेमकलह

तीः
मनसोक्त त्रास दे, मनसोक्त वार कर ।
सारे क्षम्य आहे, पण थोडेसे प्रेम कर ॥
तूच अंतरी, अंतर दुविधेत ।
वाढवी न तू ती दुविधा ॥

तोः
ग प्रेम हे, खेळणे मुळी नसे
जे, कुणीही खरीदू शके ।
माझ्याप्रमाणे, आयुष्य जळता,
ये ध्यानी सारे कसे ॥

तीः
कोणी जिव ना जडवेल,
अडाणी, अनोळख्याशी ॥
मी जडविला जीव,
त्या मान उपकारासी ।
चुकले मी एक वार,
दृष्टिव्यवहार, तुझ्यासव मी केले ॥

तोः
तुझ्या तोऱ्यास उपमा न मुळी ।
प्रेमाचा माझ्याही न थांग मुळी ॥
सुंदर खूप तुझा चेहरा असो ।
अंतर माझेही न कुरूप मुळी ॥
वंचिके, बघ तरी, एकदा, एकवार ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९१९

या प्रेमकलहात चार हिंदी गाण्यांचे मराठी अनुवाद गुंफलेले आहेत.
ओळखा बरे ती मूळ हिंदी गाणी?