चहा

  • टी बॅग्ज २
  • दूध
  • पाणी
  • साखर
५ मिनिटे
१ जण

आपल्याला ज्या कपात चहा प्यायचा आहे त्या कपाच्या पाउण कप (थोडे वर) पाणी घ्या. त्यात थोडेसे दूध घाला म्हणजे तो पूर्ण कप होईल इतके. आता हे मिश्रण एका प्लॅस्टीकच्या ग्लासामध्ये घाला. हा प्लॅस्टीकचा ग्लॉस मोठा घ्या. त्यात टी बॅग्ज २ घाला व ग्लास मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा. power - medium high व वेळ ४ मिनिटे. नंतर ग्लास बाहेर काढा. आत असलेल्या टी बॅग्ज चमच्याने खूप दाबा म्हणजे त्यात असलेल्या चहा पावडरचा रंग चहामध्ये उतरेल. नंतर कपात चहा ओतून (टी बॅग्ज वगळून) आवडीप्रमाणे त्यात साखर घालून चमच्याने ढवळा. चहा तयार! प्लॅस्टीक ग्लॉस वापरण्याचे कारण चहा गरम राहतो, लगेच गार होत नाही.

चित्रात दाखवलेल्या स्टीलच्या ग्लासच्या मापात चहाचा कप घेतला तर २ टी बॅग्ज लागतात. चहा कडक व सौम्य आवडीप्रमाणे ठरवावे. चित्रातला चहा खूप कडक पण नाही आणि खूप सौम्य पण नाही.

वेळ वाचतो. इलेक्ट्रीक शेगडीवर खूप वेळ लागतो. आच कमी ठेवली तर खूपच वेळ लागतो. आच जास्त ठेवली तर चहाचे भांडे खूप काळे होते व साफ करण्याचे कष्टही वाचतात.

स्वानुभव