काय करावे- या प्रेमामध्ये?

फर्वरी महिन्याचा शेवटचा आठवडा. ती सायंकाळ होती. वेळ निश्चित आठवतं नाही मात्र सहा वाजून गेलेले. एंजिनीरिंग च्या त्रितिय वर्षाला मी त्यावेळी होतो.   महाविद्यालयामध्ये टेक्निकल फेस्टिवल चा तो निरोप समारंभ होता.  मी मित्राबरोबर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये फिरत होतो. अचानक समोर रिसेप्शन टेबल जवळ एक मुलगी उभी असलेली मी बघितली.

हरितवसना नववधूप्रमाणे भासणाऱ्या तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. ती खाली मान घालून काही तरी हिशोब करत होती. तिच्या मुलायम काळ्याभोर केशांची एक लांबसडक वेणी डोक्याचे कंबरेपासून असलेले अंतर मोजत होती. तिचा वर्ण निमगोराच असला तरी स्वर्गातल्या अप्सरेशी तिची तुलना करण्याची माझ्या मनाची धडपड सुरू झाली.

ती तिच्याच कामामध्ये मशगुल होती. आणि मी तिला बघून माझी सर्व कामे विसरलो. अथांग ब्र्हमांडामध्ये, माझ्या या कवडीमोल जीवनातील एक क्षण ती या स्थूल विकृत देहाकडे बघून अनमोल करेल या अपेक्षेने मी बराच वेळ थांबलो. पण, मी प्रेम शोधणारा "चातक" निघालो. काही क्षणातच मझा मित्र अपयश मला डोळ्यासमोर दिसला.  हाथ धरून तो मला माझ्या होस्टेल वर घेउन गेला.  तो प्रसंग,  ती साडी,  ते केश, आणि ते सौंद्य्र विसरायला मला संपुर्ण सेमिस्टर गेली. मी तिला जवळपास विसरलोच होतो. पण.....................................

२००८ चा जानेवारी महिना.  स्नेहसम्मेलनामध्ये मी तिला परत बघितले. माझे भान हरपले. मला काय होते आहे हे कळायच्या आतच नाजुक भावनांचा पाउसच जणु माझ्या मनात पडला. आणि त्यामुळे माझे सर्व अंतरंग रोमांचित प्रवाहामध्ये चिंब भिजून गेले......................

(क्रमशः)