राजस फ्लॉवर

  • अर्धा किलो फ्लॉवर
  • मीठ
  • ओले खोबरे
  • मिरेपुड
१० मिनिटे

एकीकडे फ्लॉवरची फुले धुवून मीठाच्या पाण्यात शिजवायला ठेवावी आणि दुसरीकडे नारळाची वाटी खवणावी. फ्लॉवरची फुले चांगल्या पैकी शिजली की चाळणीवर काढून पाणी जाऊ द्यावे.  आता ही फुले ताटात घेऊन 
त्यावर मिरेपुड व ओले खोबरे भुरभुरावे.  हलक्या हाताने हे मिश्रण खाली वर करावे आणि खावे.   

फ्लॉवर अति शिजवू नये.  तसेच बाजारातून फ्लॉवर पांढरट न आणता किंचित पिवळट आणावा.  
पांढरा धोप फ्लॉवर खायला चांगला लागत नाही. शक्यतो फ्लॉवर,  ओले खोबरे ताजेच असावे.   

घरी, उपासाच्या दिवशी हा फ्लॉवर प्रकार करत असत.