गणितातील मौजा

ज्ञानं च लोके यदि अस्ति किंचित् ।
संख्यागतं तच्च महान् महात्मन् ।
--- महाभारत

हे महात्म्या, जगात जर काही ज्ञान असेल तर त्यातील बरेचसे आकड्यांनीच भरलेले आहे.


ज्ञानप्राप्तीसाठी गणित शिकायला पाहिजे हे सर्वच मान्य करतात पण तरीही गणित हा विषय रुक्ष आहे अशी खूप लोकांची समजूत असते. ही समजूत खरं म्हणजे चुकीची आहे. गणितातही खूप गमती, मनोरंजक गोष्टी असतात. अशाच काही गमतींचा परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न.