बेक्ड चिकन

  • मेयॉनीज़
  • पावाचा चुरा
  • ६-८ कोंबडीचे तुकडे
  • हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले चीज़
  • लसूण पाकळ्या २
  • चवीला मीठ
४५ मिनिटे
४ जणांना

हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे.  चांगली भट्टी(ओव्हन) हवी.

चिकनचे मोठे तुकडे साल काढलेले घ्या.  शक्यतो मांड्या आणि छातीचे असावेत.  बकीचे तुकडे रस्सा करण्यासाठी वापरता येतील.
तुकड्यांना सढळ हाताने मेयॉनीज़ लावा.  लसूण वाटून पावाच्य्य (कुरकुरीत) चुऱ्यात घाला.  सगळे कोंबडीचे तुकडे पावाच्या चुऱ्यात चांगले घोळा.  पाहिजे असेल तर त्यावर बदामाचे काप  लाव.

सर्व तुकडे आधी ३५० फॅरनहाईट पर्यंत तापविलेल्या भट्टीमन्धे एक थराने थोडे पसरून ठेवा.  ८-१० मिनिटामधे तांबूस खमंग होतील.  चीज़ हवे अस्ल्यास शेवटच्या २ मिनिटासाठीच घालायचे.

सांगा आहे की नाही सोपी कृती?

क्राफ्ट्चा पुस्तकातून आजमाऊन अघ्तली आहे.