ओठांवर तुजला सजवावे (भावानुवाद)

मूळ गजलचा दुवाः दुवा क्र. १

ओठांवर तुजला सजवावे, असे वाटते
मला, सतत तुला गुणगुणावे, असे वाटते...

काहि आसवे पदरावर ढाळून तुझ्या मज
अश्रूंना मोती बनवावे, असे वाटते...

दमलो आहे स्मरता स्मरता तुला एवढा
अतातरी तू मला स्मरावे, असे वाटते...

अंधार पसरला आहे इथल्या वस्तीवर
तेजाने मज घर उजळावे, असे वाटते...

तुझ्या मांडिवर श्वास शेवटी सोडावा अन
मरण असे काव्यात्मक यावे, असे वाटते...