रवींद्र भटांचे निधन

काल सकाळी ७.३० च्या सुमारास मित्राचा फोन आला. मराठीतील एक ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र भटांच्या निधनाचे वृत्त मिळाले नि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. साहित्य परिषदेची बारामती शाखा स्थापना करण्यात त्यांची आम्हांला खुप मदत झाली होती. त्यांच्या इंद्रायणी काठी(ज्ञानेश्वर), भगीरथ, घास घेई पांडुरंगा(नामदेव), भेदिले सूर्यमंडळा (रामदास), अशा अनेक चरित्र-कादंबऱ्या प्रसिद्ध होत्या. श्रमिकहो घ्या इथे विश्रांती, दिव्या दिव्याची ज्योत सांगते , उठा राष्ट्रवीर हो, उठी श्रीरामा पहाट झाली, अशी अनेक गीतेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्याबरोबर वाई, ठाणे येथे झालेल्या परिषदेच्या शाखा मेळाव्याच्या निमित्ताने प्रवासही करण्याचा आनंद घेता आला. त्यांच्या त्या वेळच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. खुप वाईट वाटले. त्यांना श्रद्धांजली.