चमत्कारिक वागणूक

लहानपणापासून एक गंमतीदार गोष्ट पाहतो आहे.
दिवसा एखाद्या दुचाकीस्वाराचा दिवा लागलेला असेल तर समोरून येणारा एखादा स्वार तो दिवा लागलेला आहे, हे हात गोल फिरवून सांगतो. सांगणारा चालक ज्याचा दिवा लागला आहे त्याचा नातेवाईक किंवा मित्र नसतो. तरीही, तो अगदी हटकून सांगतोच.  
या बाबत अगदी कटाक्षाने वागणारा आपला समाज वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत उदासीन असतो.
दिवा लागला आहे, हे सांगणारा माणून स्वतः वाहतुकीचे नियम पाळत असेलच असे नाही. तो माणूस दुसऱ्या चालकाला नियम पाळा, दिवसा दिवा लागला आहे हे लक्षात आणून देण्यात चूक नाही. पण वाहतुकीचे नियम पाळणे, ही त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे.

मानवी वागणूक कधी कधी अत्यंत चमत्कारिक वाटते.