थेंब एक असा बरसून गेला..
=====================
.
.
गडगडाट ना कल्लोळ झाला..
घननीळ मुक्याने बोलून गेला..
.
सुटला ना जरा भिरभीर वारा..
वादळ थेंबात निचरून गेला..
.
झाकोळ रात्रीत दडवून गेला..
अवचित पाऊस बरसून गेला..
.
दिशा दिशांत पसरवून शहारा..
अंतरंगी गारवा झिरपून गेला..
.
अलवार झेलता झेला नाभीचा..
अलगूज कधीचे मांडून गेला..
.
कितीक अश्या अबोल गाथा..
भिजल्या मला सांगून गेला..
.
थेंब एक असा बरसून गेला..
थेंब एक असा भिजवून गेला..
.
.
=====================
स्वाती फडणीस............. २२-१२-२००८