मराठी अभ्यास परिषदेतर्फे दरवर्षी दिला जाणारा महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार यंदा प्रा० यास्मिन शेख ह्यांनी संपादित केलेल्या मराठी शब्दलेखनकोश (प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे) ह्या पुस्तकास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रा० यास्मिन शेख ह्यांना, डॉ० प्रमोद तलगेरी (कुलगुरू, मल्टिव्हर्सिटी) ह्यांच्या हस्ते शुक्रवार, दि० १६ जानेवारी २००९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वेदशास्त्रोत्तेजक संस्थेचे सभागृह, टिळक रस्ता, पुणे ४११ ०३० येथे होणार्या समारंभात देण्यात येईल. ह्या निमित्ताने डॉ० प्रमोद तलगेरी ह्यांचे जागतिकीकरण आणि भाषांचा विकास ह्या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्व जनतेस खुला असून सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे.
मूळ दुवा : महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार २००९