हे रुपक लोकमान्यांच्या चिरंजीवांना समर्पित आहे तसेच गांधीच्या ही. तसेच त्या साऱ्या थोरांच्या मुलांना, ज्याचे अस्तित्व त्यांच्या असामान्य वडिलांच्या कर्तबगारीमूळे पुर्णपणे झाकोळले गेले.
वड आभाळा आभाळा
मुळे पाताळा पाताळा
व्यापुनिया, झाकुनिया
तळा पाचोळा पाचोळा
वड महात्मा महात्मा
जो तो लवतो लवतो
शेंदूर फासून तयास
स्थळी पुजतो पुजतो
रूजे पारंबी पारंबी
त्यांच्या कथा दुज्या दुज्या
सावलीत वडाच्या त्या
भासतात खुज्या खुज्या
वडा भोवती भोवती
रोपे अंकुरे अंकुरे
हाही वड, तोही वड
घोष संकरे संकरे
जीवे आकांत आकांत
करी फांदी, पर्ण पर्ण
देता ओळख जगाला
पिंपळ निष्पर्ण निष्पर्ण