अन्यथा...
क्षणी शत्रू भस्म इतक्या
पेटतील मशाली,
नका समजू धरेस आमुच्या
हतबल रुदाली.
भले जरी आम्हावर
सहिष्णू सन्स्कारांची सावली,
अंतरी जागृत ज्वालामुखीही तप्त
जयाने तव भूवरही आक्रोश शक्तिशाली.
जगलो शक्यतो स्वयंभूच आजवर
कुणासही न केली अस्मिता हवाली,
शेजाऱ्यांनो समजा भाषा प्रेमाची
अन्यथा संकटात साऱ्यांचीच खुशाली.